स्त्री भ्रूणहत्याः कोल्हापुरातले वास्तव (भाग १)
[अमृता वाळिंबे यांनी मालतीबाई बेडेकर अभ्यासवृत्ती २००५-२००६ वापरून केलेले संशोधन आम्हाला प्राप्त झाले. त्याचा जुजबी संक्षेप करून आम्ही काही भागांमध्ये ते संशोधन प्रकाशित करीत आहोत. या प्रकारचे संशोधन महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांकरिता व्हायला हवे.] कोल्हापूर. अनेक अर्थांनी समृद्ध म्हणवला जाणारा महाराष्ट्रातला एक जिल्हा. सहकारी चळवळींचा भक्कम पाया, त्यातून आलेली आर्थिक सुबत्ता, लघुउद्योगाचे पसरलेले जाळे, शिक्षणासारख्या सामाजिक …